काल रात्री मित्राच्या घरी असतानाच सिद्धार्थच्या छातीत दुखू लागलं आणि…

हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच त्याचा ९.२५ च्या दरम्यान मृत्यू झाला होता. सिद्धार्थचा मृतदेह कूपर रूग्णालयात ठेवण्यात आला आहे.

    अभिनेता सिद्धार्थ शुल्काच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. केवळ ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.  त्यासा कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रात्री झोपण्यापूर्वी त्याने काही औषध घेतली होती. मात्र ती नेमकी औषध कोणती होती हे अद्याप समजलेलं नाही.

    सिद्धार्थला बुधवारी रात्री छातीत दुखायला लागलं. त्यावेळी सिद्धार्थ त्याच्या मित्राच्या घरी होता. आज सकाळी मित्राने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत पलंगावर पडलेला दिसून आला. सिद्धार्थला अशा अवस्थेत पाहून मित्राने ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि नंतर तो त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

    हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच त्याचा ९.२५ च्या दरम्यान मृत्यू झाला होता. सिद्धार्थचा मृतदेह कूपर रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. थोड्याच वेळात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सध्या कूपर रूग्णालयात त्याची आई आणि बहिण उपस्थित आहे.