सिद्धार्थ आणि शहनाज गिल करणार होते लग्न, फॅन्सची ही इच्छा राहिली अपूर्ण!

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलमधील असलेला बॉण्ड हा ‘बिग बॉस १३’ च्या घरात असल्या पासूनचा होता. ‘बिग बॉस’ व्यतिरिक्त या दोघांनी दोन म्युझीक व्हिडिओमध्ये काम केलं आहे.

    अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा होता. केवळ ४० व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. काही महिन्यांपासून अशी चर्चा रंगली होती की, तो त्याची जवळची मैत्रीण शहनाज गिलबरोबर लग्न करणार होता.

    सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलमधील असलेला बॉण्ड हा ‘बिग बॉस १३’ च्या घरात असल्या पासूनचा होता. ‘बिग बॉस’ व्यतिरिक्त या दोघांनी दोन म्युझीक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघं ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘डान्स दिवाने’या दोन शो मध्ये स्पेशल जज म्हणून गेले होते. त्या दोघांनी लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. ते दोघे कपल असले नसले तरी ते लवकरच लग्न करमार असल्याच्या बातम्या पसरत होत्या. अनेकदा त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं.

    सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.