गायक हिमेश रेशमियाची नव्या अल्बम सॉंगमधून पुन्हा दमदार एन्ट्री, सोशल मीडियावर पोस्टर रिलीज!

या टीझर पोस्टरमध्ये हिमेशच्या जुन्या स्टाइलमधली आयकॉनीक कॅप आणि माइक दाखवण्यात आला आहे. त्याच्या जुन्या अंदाजाची झलक पहायला मिळाली.

  संगीत दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमियाचा सगळ्यात पहिला अल्बम ‘आप का सुरूर’ हे गाणं आठवत असेल. ‘तेरा सुरुर’ गाण्यामुळे गायक हिमेश रेशमिया एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर हिमेश ‘सुरूर २०२१’ या नव्या अल्बम सॉंगमधून पुन्हा दमदार एन्ट्री करतोय. नुकतंच त्याच्या नव्या गाण्याचं टीझर मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलाय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

  या टीझर पोस्टरमध्ये हिमेशच्या जुन्या स्टाइलमधली आयकॉनीक कॅप आणि माइक दाखवण्यात आला आहे. त्याच्या जुन्या अंदाजाची झलक पहायला मिळाली. तसंच बॅकग्राऊंडला प्रेक्षकही दाखवण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये त्याच्या आयकॉनीक कॅपवर ‘एचआर’ असं लिहून त्याच्या गाण्यांचा म्यूजिक लेबल ‘हिमेश रेशमिया मेलोडीज’ लॉंच करण्यात आलाय. “सुरूर २०२१ चं अल्बम टीझर पोस्टर…खूप सारं प्रेम…” तसंच #loveyou हा हॅशटॅग देखील त्याने या पोस्टमध्ये दिलाय.

  गायक हिमेश रेशमियाचा २००७ साली रिलीज झालेला ‘आप का सुरूर’ या त्याच्या सगळ्यात पहिल्या अल्बम सॉंगला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. याच्या अल्बम सॉंगच्या जवळपास ५५ मिलियनपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेल्या होत्या. मायकल जॅक्सन यांच्या नंतर हिमेशचा हा अल्बम जगभरात सगळ्यात जास्त विकला गेलेला अल्मब सॉंग ठरला.