बोगस प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला ड्रग्ज देण्यात बहिणीचा हात, धक्कादायक खुलासा…

सुशांतची बहीण सुशांतला बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे त्याला अंमली पदार्थ देत असल्याची खळबळजक माहिती उजेडात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ही माहिती आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. याप्रकरणी सुशांतची बहीण, काही नातेवाईक आणि डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून या सर्वांची माहिती आपण सीबीआकडे दिली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) आत्महत्याप्रकरणी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तसेच अंमली पदार्थां प्रकरणी (Drugs Connection) आता एनसीबीने (NCB) कारवाईचा वेग वाढवला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अंमली पदार्थ आणि सप्लाई (Supply) केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. परंतु आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

सुशांतची बहीण सुशांतला बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे त्याला अंमली पदार्थ देत असल्याची खळबळजक माहिती उजेडात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ही माहिती आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. याप्रकरणी सुशांतची बहीण, काही नातेवाईक आणि डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून या सर्वांची माहिती आपण सीबीआकडे दिली आहे.

सीबीआय याप्रकरणी योग्य तो तपास करेल, असा विश्वास परमबीर सिंग यांनी यावेळी बोलून दाखविला. सुशांतला हे ड्रग्ज देण्यासाठी सुशांतच्या बहिणीने दिल्लीतील डॉक्टर तसेच सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शन आणि रेकॉर्ड तयार केल्याचे देखील त्यांनी यावेळी उजेडात आणले आहे.