सगळ्यात बिझी आहे ही अभिनेत्री, चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत तिच्याकडे!

दिग्दर्शक वंदना कटारीया सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहेत. 'सितारा' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात सोभिता एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

    काही कलाकार आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर रसिकांसोबतच सिनेसृष्टीतील निर्माता-दिग्दर्शकांचंही लक्ष वेधून घेत असतात. मॅाडेलिंगसोबतच अभिनयही करणारी सोभिता धुलिपालाही याला अपवाद नाही. सोभितानं कायम आपल्या अभिनयाचा ग्राफ चढता राहिल याकडं लक्ष दिलं आहे. आज हिंदीसोबतच दक्षिणेकडील तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही ती अभिनय करत आहे. याखेरीज ‘मंकी मॅन’ या बहुचर्चित इंग्रजी चित्रपटातही ती दिसणार आहे.

     दिग्दर्शक वंदना कटारीया सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहेत. ‘सितारा’ असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात सोभिता एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. निर्माते रॅानी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी मुव्हीजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटातील सोभिताच्या भूमिकेबाबत अद्याप तरी काही माहिती उघड करण्यात आली नसली, तरी ही व्यक्तिरेखा सोभितामध्ये दडलेल्या अभिनेत्रीमधील आजवर कधीही समोर न आलेले पैलू सादर करणारी असल्याचं सांगितलं जात आहे.

     याशिवाय सोभिताकडे हिंदीसोबतच तेलुगूमध्ये बनणारा ‘मेजर’, मल्याळम ‘कुरुप’ आणि ‘पोन्नीइन सेल्व्हन’ हा तमिळ चित्रपट आहे.