सोनाक्षी-रितेश-साकिबसोबत आदित्यचा ‘ककुडा’!

निर्माते रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सोनाक्षी-रितेशसोबत या चित्रपटात साकीब सलीमही झळकणार आहे.

    सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख प्रथमच एकत्र काम करणार आहेत. हॉरर-कॉमेडी असलेल्या आगामी चित्रपटानं दोघांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. निर्माते रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सोनाक्षी-रितेशसोबत या चित्रपटात साकीब सलीमही झळकणार आहे. या चित्रपटात घोस्ट हंटरची भूमिका साकारणाऱ्या सोनाक्षीसोबत तो रोमान्स करताना दिसेल.

    ‘उलाढाल’, ‘सतरंगी रे’, ‘नारबाची वाडी’, ‘क्लासमेट्स’, ‘फास्टर फेणे’ आदी मराठी चित्रपटांसोबतच ‘थोडी थोडी सी मनमर्जीयां’ आणि ‘द रायकर केस’ या हिंदी चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणारा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारकडं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवण्यात आली आहे. या चित्रपटाचं शीर्षक ‘ककुडा’ असं ठेवण्यात आलं आहे.

    आदित्यनं यापूर्वी रितेशसोबत ‘माऊली’ हा मराठी चित्रपट बनवला आहे. ‘ककुडा’चं चित्रीकरण राजस्थानमध्ये करण्यात येणार असून, ४० दिवसांच्या स्टार्ट-टू-फिनीश शेड्यूलची आखणी करण्यात आली आहे. हा चित्रपट सत्य घटनांवरून प्रेरीत असल्याचं सांगितलं जात आहे.