सोनालीचा ‘आहों’ बरोबर वर्कआऊट टाईम, VIDEO बघून चाहते म्हणाले, आहो दाजी तुम्ही तर…

दोघेही एकत्र घरच्या घरी वर्कआऊट करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. तुर्तास  सोनालीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही वर्कआऊट करण्याची प्रेरणा मिळणार हे मात्र नक्की.

  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दुबईमध्ये नवरा कुणाल बेनोडेकरसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. नुकताच सोनालीने चाहत्यांसह एक खास व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत    सोनाली आणि कुणाल फक्त कपल गोलच देत नाही तर फिटनेस गोलही देत असल्याचे पाहायला मिळतंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

  सोनाली नित्यनियमाने योगा करते. तिचे वर्कआऊट योगा करतानाचे फोटो पाहायला मिळतात. मात्र समोर आलेल्या व्हिडीओत सोनालीसह कुणाललाही वर्कआऊटची आवड असल्याचे समोर आले आहे. दोघेही एकत्र घरच्या घरी वर्कआऊट करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. तुर्तास  सोनालीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही वर्कआऊट करण्याची प्रेरणा मिळणार हे मात्र नक्की.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

  कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता सोनाली आणि कुणालने लग्नात फारसा खर्च न करण्याचा निर्णय घेतला होता. जुलै महिन्यात लग्न करण्याचं जवळपास सर्वकाही ठरलंही होतं. पण मग साधेपणानेच लग्न करायचं असेल तर दोन महिने का थांबा असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी जुलैऐवजी मे महिन्यातच लग्न सुखी संसाराला सुरुवात केली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

   चाहत्यांनी केल्या कमेंट्स

  सोनालीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. आमचे दाजी पण काही कमी नाहीत असं म्हणत सोनालीच्या नवऱ्याचं कौतुकही अनेकांनी केलं आहे, तर तुमचा हा व्हिडिओ बघून आम्हालाही व्यायामाची प्रेरणा मिळाल्याचं एका चाहत्याने म्हटलं आहे.