सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर सोनाली कुलकर्णीची धम्माल!

एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज आणि अप्सरा सोनाली कुलकर्णी या दोघी या मंचावर आपल्या उपस्थितीने बहार आणणार आहेत.

  ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ च्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न देखील मंत्रमुग्ध होतात. आता पर्यंत अनेक लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळालं असून अनेकांनी परफॉर्मर ऑफ द वीकचा खिताब देखील मिळाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

  या आठवड्यात या मंचावर या सर्व लिटिल चॅम्प्सच कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या गाण्यांचा आनंद घेण्यासाठी २ सुप्रसिद्ध अभिनेत्री सज्ज होणार आहेत. एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज आणि अप्सरा सोनाली कुलकर्णी या दोघी या मंचावर आपल्या उपस्थितीने बहार आणणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  इतकंच नव्हे तर लिटिल चॅम्प्स या अभिनेत्रींची काही गाणी सादर करणार आहेत आणि त्यांना मंचावर ताल धरायला भाग पडणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  सोनाली कुलकर्णी हिने सर्व लिटिल चॅम्प्सना त्यांना या वयात लाभलेला आवाज हि त्यांना मिळालेली देणगी आहे असं म्हणत त्यांचं कौतुक केलं. तसेच किशोरी ताई, सोनाली, मृण्मयी आणि कार्तिकी यांनी चला जेजुरीला जाऊ या गाण्यावर ठेका धरला.