नवराष्ट्रच्या मंचावर सोनालीने कुणालरावांसाठी घेतला धम्माल उखाणा!

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णीला या सोहळ्यात बेस्ट पॅाप्युलर फिल्म अॅक्ट्रेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    समाजातील कर्तृत्ववान महिलांना सन्मान करणारा नवराष्ट्रचा वुमन अॅचिव्हर्स अॅवॅार्डस २०२१ हा सोहळा ठाण्यातील टिपटॅाप प्लाझामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे नेते-लेखक-दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील दिग्गजांनी हजेरी लावली. महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णीला या सोहळ्यात बेस्ट पॅाप्युलर फिल्म अॅक्ट्रेस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    लग्नानंतर सोनालीला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. नवभारतच्या पहिल्या पानावर पती कुणालचा प्रकाशित झालेला फोटो दाखवत सोनालीनं मंचावर एंट्री केली. कुणालसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा सोहळा अटेंट करत असल्याचं सांगत नवराष्ट्र वुमन अॅचिव्हर्स अॅवॅार्डस सोहळ्याला यायचं असल्यानं खास मंगळसूत्र घालून आल्याचं सोनाली म्हणाली. या मंचावर सोनालीनं उखाणा घेत उपस्थितांना सुखद धक्का दिला. सोनाली म्हणाली की, ‘त्याचा जन्म लंडनचा, पण तो रहातो दुबईत, मला बाई आवडतो महाराष्ट्र, कुणालरावांचं नाव घेते वाचता-वाचता नवराष्ट्र’.

    या सोहळ्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, गायिका वैशाली सामंत, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, लेखिका रोहिणी निनावे, फिल्म एडिटर क्षितिजा खंडागळे या मनोरंजन विश्वातील महिलांसह विविध क्षेत्रांतील स्त्रियांच्या कार्याला पुरस्कार देऊन सलाम करण्यात आला. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा मेघना एरंडे जोशीनं सांभाळली, तर जान्हवी प्रभू अरोरानं आपल्या बहारदार गायकीनं या सोहळ्याला रंगत आणली.