sonu_sood

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांसाठी केलेले काम आपण सगळ्यांनीच पाहीले आहे.त्यानंतर सोनू सूदच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र सोनूने आपली भाजपमध्ये प्रवेश

 लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांसाठी केलेले काम आपण सगळ्यांनीच पाहीले आहे.त्यानंतर सोनू सूदच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र सोनूने आपली भाजपमध्ये प्रवेश करण्यची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचे सोनू सूदने सांगितले आहे.

सोनूने एका मुलाखतीत असे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांशी जोडले जाण्याची पद्धत मला आवडते.त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आणि आदर्श आहे. मात्र भाजपात जाणार नसल्याचेही सोनूने स्पष्टपणे सांगितले आहे. राजकारणात जाण्याची इच्छा नसल्याचे त्याने सांगितले. अभिनेता म्हणून चांगल काम करत राहणार असल्याचे सोनू म्हणाला.