sharad pawar - sonu sood new

मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता. सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला अभिनेता सोनू सूदने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला १३ जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवासंपासून जूहू येथील हॉटेल बांधकाम प्रकरणी तो पुन्हा एकदा चर्चेत आला. पण आता सोनू सूदने शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. पण अद्याप या भेटीबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय.

अवैध बांधकामप्रश्नी उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता. सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला अभिनेता सोनू सूदने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला १३ जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सोनू सूद म्हणतो,

“बदल करण्यासाठी मी आधीच महापालिकेकडून परवानगी घेतलेली आहे. हा विषय महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीचा आहे. कोरोनामुळे परवानगी मिळू शकली नाही. यामध्ये कोणताही गैरकारभार नाही. मी नेहमीच कायद्याचं पालन केलं आहे. कोरोना संकटात हे हॉटेल कोरोना योद्ध्यांसाठी वापरण्यात आलं. जर परवानगी मिळाली तर मी पुन्हा याचं रुपांतर निवासी इमारतीत करेन.