sonu sood

आयकर विभागाला सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर बुडवल्याचे(20 Crore Tax Evaded By Sonu Sood) पुरावे मिळाले आहेत. आयकर विभागाने याबाबत अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलं आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत सोनू सूदने बरेच दिवस मौन बाळगलं होतं. मात्र आता सोशल मीडियाच्या(Sonu Sood Reaction On Social Media After IT Raid) माध्यमातून सोनू सूदने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    अभिनेता सोनू सूदच्या(Sonu Sood) सहा ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यानंतर आयकर विभागाला सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर बुडवल्याचे(20 Crore Tax Evaded By Sonu Sood) पुरावे मिळाले आहेत. आयकर विभागाने याबाबत अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलं आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत सोनू सूदने बरेच दिवस मौन बाळगलं होतं. मात्र आता सोशल मीडियाच्या(Sonu Sood Reaction On Social Media After IT Raid) माध्यमातून सोनू सूदने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    ट्विदरवर पोस्ट शेअर करताना सोनू सूदने लिहिले की, ‘‘अवघड रस्त्यांवरचा प्रवासही सोपा होतोय, प्रत्येक भारतीयांच्या प्रार्थनेचा परिणाम होतोय’’. पुढे सोनूने लिहिले की, ‘‘तुम्हाला प्रत्येक वेळी तुमची बाजू मांडण्याची गरज नसते काही गोष्टी वेळ सांगतो. मी भाग्यवान आहे की, मी माझ्या संपूर्ण क्षमतेने आणि मनापासून भारतीय लोकांची सेवा करू शकलो. माझ्या फाऊंडेशनमध्ये असलेला प्रत्येक रुपया मौल्यवान जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंसाठी आहे.अनेकदा मी मोठ्या ब्रँडना माझ्या कामाचे शुल्क लोकांच्या कल्याणासाठी दान करण्यास प्रोत्साहित केले आहे.ज्यामुळे सगळं व्यवस्थित सुरु आहे.’’

    सोनूने पुढे लिहिले आहे की, ‘‘मी काही पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होतो. त्यामुळे गेले ४ दिवस तुमची सेवा करु शकलो नाही. आता मी पुन्हा एकदा विनम्रतापूर्वक आयुष्यभर तुमच्या सेवेत परत आलो आहे. चांगले करा, चांगलेच होईल, शेवटही चांगला होईल. माझा प्रवास चालू राहील. जय हिंद.’’

    सोनू सूदच्या या पोस्टनंतर चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र आयकर विभाग सोनूच्या बाबतीत पुढे काय करणार असा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडला आहे.