मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता. सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला अभिनेता सोनू सूदने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला १३ जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अभिनेता सोनू सूदच्या अवैध हॉटेल बांधकामी प्रकरणात कोर्टाने निकाल राखीव ठेवलाय. या प्रकरणात आज हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी सोनू सूदच्या वकीलांनी कोर्टात सांगितलं की, आमच्याकडे आवश्यक परवानगी आहे. मात्र, बीएमसी तर्फे युक्तिवाद करण्यात आला की निवासी इमारतीमध्ये व्यवसायिक गतिविधि ठेवण्याची परवानगी देता येणार नाही. पण यावर न्यायमूर्तिंकडून आदेश सुरक्षित ठेवण्यात आलाय.
त्यात आज अभिनेता सोनू सूदने शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. पण अद्याप या भेटीबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय.
अवैध बांधकामप्रश्नी उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता. सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला अभिनेता सोनू सूदने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला १३ जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सोनू सूद म्हणतो,
“बदल करण्यासाठी मी आधीच महापालिकेकडून परवानगी घेतलेली आहे. हा विषय महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीचा आहे. कोरोनामुळे परवानगी मिळू शकली नाही. यामध्ये कोणताही गैरकारभार नाही. मी नेहमीच कायद्याचं पालन केलं आहे. कोरोना संकटात हे हॉटेल कोरोना योद्ध्यांसाठी वापरण्यात आलं. जर परवानगी मिळाली तर मी पुन्हा याचं रुपांतर निवासी इमारतीत करेन.