सोनीलिवकडून ‘स्कॅम १९९२ – दि हर्षद मेहता स्टोरी’चं प्रतिक्षित शो होणार सादर, भारताच्या आर्थिक क्षेत्राच्या घटनेवर आधारित

या ऑक्टोबर महिन्यात सोनीलिवकडून (Sony Leave) भारताच्या सर्वांत मोठ्या सिक्युरिटीज घोटाळ्यामागील माणूस आणि त्याची कथा सांगणारी 'स्कॅम १९९२- दि हर्षद मेहता स्टोरी' (Scam 1992 - The Harshad Mehta Story) नावाची १० भागांची मालिका ९ ऑक्टोबर (October) रोजी प्रसारित करण्यात येणार आहे.

एप्रिल १९९२ मध्ये देशात सर्वांत मोठा शेअर बाजार घोटाळा झाला आणि भारतीय आर्थिक क्षेत्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला. दलाल स्ट्रीटवर त्याचा इतका मोठा प्रभाव पडला की शेअरच्या व्यवहारांमध्ये मोठे बदल घडून भारताच्या आर्थिक सुरक्षा रचनेत रचनात्मक बदल करण्यात आले. तथापि, त्यामागील मास्टरमाइंडची (Master Mind) गोष्ट अद्याप कुणाला फारशी माहीत नाही. या ऑक्टोबर महिन्यात सोनीलिवकडून (Sony Leave) भारताच्या सर्वांत मोठ्या सिक्युरिटीज घोटाळ्यामागील माणूस आणि त्याची कथा सांगणारी ‘स्कॅम १९९२- दि हर्षद मेहता स्टोरी’ (Scam 1992 – The Harshad Mehta Story) नावाची १० भागांची मालिका ९ ऑक्टोबर (October) रोजी प्रसारित करण्यात येणार आहे.

अप्लॉज एंटरटेनमेंटने स्टुडिओ नेक्स्टच्या भागिदारीत निर्मिती केलेली ही मालिका ख्यातनाम पत्रकार देबाशिष बासू आणि सुचेता दलाल यांनी लिहिलेल्या ‘दि स्कॅम’ या आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित रोमांचक बेस्टसेलर पुस्तकावर आधारित आहे. निर्मात्यांनी या मालिकेवर जवळपास ३ वर्षे काम केले असून पटकथेपासून कलाकारांची निवड तसेच एकूणच कथेचा वापर यांच्याबाबत पूर्ण अचूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. स्टुडिओ नेक्स्ट हे भारतात एक प्रतिष्ठित कंटेंट निर्माते म्हणून पुढे आले आहेत आणि त्यांनी ‘स्कॅम १९९२- दि हर्षद मेहता स्टोरी’सोबत प्रथमच ओटीटी क्षेत्रात प्रवेश केला आहे.

सुमित पुरोहित, सौरव डे, वैभव विशाल आणि करण व्यास या संवाद लेखकांनी या मालिकेचे संवादलेखन केले असून ही मालिका शेअरबाजारातील कुविख्यात बिग बुल असलेल्या हर्षद मेहताचा उदय आणि अस्त यांची रोमहर्षक कथा आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेते चित्रपटनिर्माते हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेचे प्रमुख कलाकार प्रतिक गांधी आणि श्रेया धन्वंतरी आहेत. त्यांच्यासोबत सतीश कौशिक, शरीब हाश्मी, अनंत महादेवन, निखिल द्विवेदी, केके रैना, ललिता परिमू हेही कलाकार आहेत.

स्टुडिओ नेक्स्टचे प्रमुख इंद्रनील चक्रवर्ती

स्कॅम १९९२- दि हर्षद मेहता स्टोरी या भारतीय शेअर बाजारातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेवरील मालिकेसोबत ओटीटीमध्ये प्रवेश करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही घटना भारताच्या आर्थिक सुरक्षा यंत्रणेला आकार देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आणि त्यामुळे ती सांगणे अत्यंत रोमांचक ठरेल, याची आम्हाला जाणीव होती. ही आमच्यासाठी नवीन कथा सांगण्याची पद्धत होती आणि या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला पुढे नेण्यासाठी हंसल मेहता आमच्यासोबत होते.

स्कॅम१९९२- दि हर्षद मेहता स्टोरी’चे दिग्दर्शक हंसल मेहता

स्कॅम१९९२- दि हर्षद मेहता स्टोरी सोनीलिववर दाखवली जात आहे याचा मला खूप आनंद होत आहे. ही मालिका सत्यघटनांनी प्रेरित आहे आणि फारशी माहिती नसलेल्या व्यक्तीबाबत ती माहिती देते. ही कथा आजही तितकीच सुसंगत आहे, कारण ती तुम्हाला अशा एका सामान्य माणसाच्या मध्यमवर्गीय महत्त्वाकांक्षांवर प्रकाश टाकते, जो बँकिंग यंत्रणेला बुडवून आणि मोठे घोटाळे करून शून्यातून अतिश्रीमंत झाला. अप्लॉज एंटरटेनमेंट आणि स्टुडिओ नेक्स्टसोबत भागीदारी करून ती प्रेक्षकांपर्यंत आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

अप्लॉज एंटरटेनमेंटचे सीईओ, समीर नायर

स्कॅम१९९२- दि हर्षद मेहता स्टोरीसोबत आम्ही कलात्मकता आणि निर्मिती यांच्याबाबत भारतातील प्रीमियम मालिकांसाठीचे मानक उंचावले आहे. आम्ही राष्ट्रीय पुरस्कारविजेते हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक कलाकारांना आणि अत्यंत बुद्धिमान लेखकांना एकत्र आणले आहे. त्यांनी या शोवर अथक काम केले आहे. सुचेता दलाल आणि देबाशिष बासू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित हा शो आणताना एप्लॉजच्या पुस्तकांवर आधारित मालिका बनवण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आम्ही पुस्तकाचे मूळ न बदलता कथेला नाट्यमय रूप दिले आहे. युअर ऑनर, अनदेखी आणि अवरोध यांच्या यशानंतर सोनीलिवसोबत आमच्या भागीदारीतील हा चौथा शो आहे.

आशिष गोळवलकर, प्रमुख- कंटेंट सेट, डिजिटल बिझनेस, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया

स्कॅम१९९२- दि हर्षद मेहता स्टोरी हा आमचा एप्लॉज एंटरटेनमेंटसोबतचा चौथा शो आहे आणि आमच्यासाठी खास आहे कारण ओटीटीवर येण्यासाठी आमच्यासोबत यावेळी प्रथमच स्टुडिओ नेक्स्ट आहे. ही कथा विविध प्रकारचे टॅलेंट, कथाकथन आणि तंत्राने युक्त आहे. आम्हाला आशा आहे की, आमच्या आधीच्या शोजप्रमाणेच स्कॅम १९९२ लाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल आणि प्रेक्षकांपर्यंत भारताच्या गोष्टी आणण्याचे आमचे वचन पुन्हा एकदा कायम केले जाईल.