‘गाथा नवनाथांची’ मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, कार्य, महात्म्य जाणून घेता येणार भक्तांना!

. मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायांचे आद्य गुरू. त्यांनतर गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ,  नागनाथ, चरपटीनाथ अशी देव अवतारी नऊ गुरूंची परंपरा या संप्रदायाला आहे.

    सोनी मराठी वाहिनीची पहिली पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ असे या मालिकेचे नाव आहे. नाथ संप्रदायाचे गुरू नवनाथ यांचे चरित्र मालिका रूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विशेष म्हणजे अनेकांना नवनाथ हे केवळ छायाचित्रातूनच माहिती आहेत, या निमित्ताने त्यांचे कार्य, महात्म्य जाणून घेता येईल. येत्या २१ जूनपासून या आध्यात्मिक पर्वाला सुरुवात होणार आहे.

    हरी आणि हर यांचा संगम सांधणारे अशी या संप्रदायाची ओळख आहे. मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायांचे आद्य गुरू. त्यांनतर गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ,  नागनाथ, चरपटीनाथ अशी देव अवतारी नऊ गुरूंची परंपरा या संप्रदायाला आहे. त्यांचे चरित्र दृश्य रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम सोनी मराठी करत आहे.

    संतोष अयाचित आणि पौराणिक मालिका हे समीकरण सर्वांनाच ज्ञात आहे, त्यामुळे ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या मनात घर करणार यात शंकाच नाही. अविनाश वाघमारे या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. तर नवनाथांच्या भूमिकेसाठी अनेक नव्या पण दर्जेदार कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचं समजत आहे.