श्रीमंताघरची सून’ मालिकेत सुप्रिया पाठारे दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत!

घरात सतत काही तरी कारस्थान करणाऱ्या देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.

    राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांमध्ये होते आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे.

    या मालिकेत अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर ही प्रसिद्ध जोडी एकत्र दिसत आहे. तर तरुणींमध्ये चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला यशोमान आपटे आणि आनंदी या भूमिकेतून आपल्या अभिनयाची वेगळी बाजू दाखवणारी अभिनेत्री रुपल नंद य मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. घरात सतत काही तरी कारस्थान करणाऱ्या देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.

    कर्णिक कुटुंबात देविकाच्या कारस्थानानी काय नवं वादळ येणार आणि त्याला अथर्व आणि अनन्या  कसे तोंड देणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहा, ‘श्रीमंताघरची सून’, सोम.-शनि., रात्री ८ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.