Sab TV

सोनी सबवरील(Sony Sab) मालिका आता आठवड्यातून सहा दिवस(Sony Sab Six Days A Week) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

    सोनी सबवरील(Sony Sab) मालिका आता आठवड्यातून सहा दिवस(Sony Sab Six Days A Week) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Sony Sab Update)९ ऑक्‍टोबरपासून सोमवार ते शनिवार प्रेक्षक आपल्या आवडत्‍या मालिका पाहू शकतात. सोनी सबवरील हलकाफुलका कंटेंट व अद्वितीय कॅरेक्टर्स घरोघरी पोहोचली आहेत. सहा दिवसांच्या आठवड्याचा शुभारंभ करण्‍याकरता सोनी सबनं शनिवारसाठी स्‍पेशल महासंगम उत्‍साही जोडी राखी सावंत व केतन सिंग यांची निवड केली आहे. राखी व केतन दोन सर्वात प्रसिद्ध चोर ‘बेगम व बादशाह’ची भूमिका साकारणार आहेत, जे २१ राज्‍यांमध्‍ये चोरी करून पळून गेले आहेत. कोणालाही त्‍यांचं खरं नाव व खरा चेहरा माहित नाही. कारण त्‍यांनी वेगवेगळ्या रूपांमध्‍ये लोकांना फसवलं आहे.

    याबाबत राखी म्‍हणाली की, सोनी सबवरील सर्व मालिका सहा दिवस प्रसारित करण्‍याचा निर्णय उत्‍साहवर्धक आहे. माझ्या मते मनोरंजन कधीच थांबू नये. महासंगम शनिवारसाठी केतन व मी चॅनेलवरील मालिकांच्‍या कथानकांमध्‍ये रोमांचक ट्विस्‍ट्स व वळण घेऊन येणार आहोत. या शनिवारी रोमांच, उत्साह व पॉवर-पॅक परफॉर्मन्‍स पहायला मिळणार असल्याचं राखी म्हणाली. यासोबतच ‘वागले की दुनिया’, ‘शुभ लाभ – आपके घर में’ यांसारख्या आणखी मालिकाही सहा दिवस मनोरंजन करणार आहेत.