सोनी बीबीसी अर्थचा आगामी शो ‘लाइफ ऑफ दि लीश’ दाखवणार कुत्र्यांसोबतच्‍या अनोख्‍या साहसी भटकंतीला

देशभरातील न पाहण्‍यात आलेल्‍या प्राचीन स्‍थळांचा शोध घेणारा शो 'लाइफ ऑफ दि लीश' लॉकडाऊनमुळे घरामध्‍येच असलेल्‍यांना भव्‍य व्हिज्‍युअल ट्रीट आहे. हिमालच प्रदेश व मेघालयपासून केरळ व पाँडिचेरीपर्यंत या एपिक ४ महिन्‍यांच्‍या लांबच्‍या प्रवासामध्‍ये २० राज्‍यांमधील १२,५०० किमी अंतरांचा टप्‍पा पार करण्‍यात येईल.

  मुंबई : सोनी बीबीसी अर्थचा नवीन शो ‘लाइफ ऑफ दि लीश’सह घरातूनच आरामात भारतभरातील पर्यटनाचा आनंद घ्‍या. या शोमध्‍ये होस्‍ट्स व ट्रॅव्‍हल जंकीज तन्वीर ताज आणि प्रि‍यंका जेना त्‍यांचे कुत्रे – गोल्‍डन रिट्रायव्‍हर आणि क्रूझ – लॅब्राडोर यांच्‍यासोबत अनोख्‍या रोड ट्रिपवर जाणार आहेत.

  सोनी बीबीसी अर्थवर ३१ मे रोजी रात्री १० वाजता सुरू होणारा आणि गो-प्रो द्वारे प्रस्‍तुत करण्‍यात आलेला हा अनोखा सेल्‍फ-शॉट प्रवासवर्णनासंदर्भातील शो प्रत्‍येक पर्यटनप्रेमी व पाळीव प्राण्‍यांची आवड असलेल्‍यांनी पाहिलाच पाहिजे. हा शो न पाहिलेली स्‍थळे, अनस्क्रिप्‍टेड कथा आणि अतुलनीय साहसी कृत्‍यांना दाखवतो.

   

  देशभरातील न पाहण्‍यात आलेल्‍या प्राचीन स्‍थळांचा शोध घेणारा शो ‘लाइफ ऑफ दि लीश’ लॉकडाऊनमुळे घरामध्‍येच असलेल्‍यांना भव्‍य व्हिज्‍युअल ट्रीट आहे. हिमालच प्रदेश व मेघालयपासून केरळ व पाँडिचेरीपर्यंत या एपिक ४ महिन्‍यांच्‍या लांबच्‍या प्रवासामध्‍ये २० राज्‍यांमधील १२,५०० किमी अंतरांचा टप्‍पा पार करण्‍यात येईल.

  कारमध्‍ये कुत्र्यांचे आहार असलेले बकेट आणि अनेक संस्‍मरणीय आठवणी निर्माण करण्‍याच्‍या मिशनसह तन्वीर व प्रियंका भारताच्‍या अभूतपूर्व स्‍थळांना दाखवण्‍यासोबत स्‍थानिक लोकांसोबत गप्‍पागोष्‍टी करतील आणि सर्व संभाव्‍य प्रदेश, हवामान आणि भारतीय पाककलांचा अनुभव घेतील.

  रोमांच, पर्यटन व कुत्र्यांची आवड असलेल्‍यांनी पाहा ‘लाइफ ऑफ दि लीश’ ३१ मे पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्‍त सोनी बीबीसी अर्थवर

  Sony to show BBC Earths upcoming show Life of the Leash for a unique adventure with dogs