‘सकाळची लाळ त्वचेसाठी गुणकारी’, अभिनेत्रीने दिल्या चाहत्यांना टिप्स!

जर एखाद्याला त्वचेच्या जास्त समस्या असतील तरी त्याने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली. तमन्ना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अनेकदा त्वचेची काळजी घेते.

    अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्याचसोबत अनेकदा तमन्ना चाहत्यांसोबत ब्युटी टीप्सदेखील शेअर करत असते. एका मुलाखतीत तमन्नाने चेहऱ्यासाठी सकाळी लाळ उपयुक्त असल्याचं म्हटंलं आहे. तमन्नाला तिने आजवर चेहऱ्याला लावलेली विचित्र गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आधी तमन्नाने तिने एकदा चेहऱ्याला कोणती तरी माची आणि अ‍ॅपल साईडर व्हिनेगरचा लेप लावला असल्याचं सांगितलं. पुढे तमन्ना म्हणाली, “कदाचित हे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असले, ऐकायला जरा विचित्र वाटतं असलं तरी सकाळीची लाळ मी लावली आहे. पण ती खरचं त्वचेसाठी गुणकारी असते.” असते.

    जर एखाद्याला त्वचेच्या जास्त समस्या असतील तरी त्याने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली. तमन्ना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अनेकदा त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी चाहत्यांनी टिप्स देत असते. तसचं तमन्ना फिटनेस प्रेमी असून वर्क आऊटचे व्हिडीओ ती शेअर करत असते.

    तमन्ना लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चुडिंया’ या सिनेमात झळकणार आहे. यासोबत ती तेलगू भाषाते लवकरच येणाऱ्या ‘मास्टर शेफ’ या शोमध्ये होस्टच्या रुपाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.