thalapathy vijay

सध्या थलापती विजय(Thalapathy Vijay) वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. विजयने स्वतःच्याच पालकांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात(Madras High Court) केस दाखल केली आहे. थलापती विजयने(Thalapathy Vijay Filed Complaint Against His Parents) आपल्या आईवडिलांसह आणखी ११ लोकांविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

    दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजय ( Actor Thalapathy Vijay) त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. चाहत्यांना विजयचा अभिनय आणि संवादाची शैली खूप आवडते. त्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चा सुरु असते. मात्र सध्या थलापती विजय वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. विजयने स्वतःच्याच पालकांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात(Madras High Court) केस दाखल केली आहे. थलापती विजयने(Thalapathy Vijay Filed Complaint Against His Parents) आपल्या आईवडिलांसह आणखी ११ लोकांविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

    विजयचे वडील एस ए चंद्रशेखर यांनी काही काळापूर्वी राजकीय पक्ष सुरू केला होता. या पक्षाचे नाव होते अखिल भारतीय थालापती विजय मक्कल इयक्ककम.  निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये विजयच्या वडिलांचे नाव या निवडणूक पक्षाचे सरचिटणीस म्हणून आहे. त्याची आई शोभा चंद्रशेखर या पक्षाच्या कोषाध्यक्ष आहेत.

    काही काळापूर्वी विजयने आपल्या निवेदनात म्हटले होते की, त्याचा या निवडणूक पक्षाशी कोणताही संबंध नाही. विजयने आपल्या वक्तव्यात चाहत्यांना फक्त त्याचे नाव पाहून या पार्टीत सामील न होण्याचे आवाहन केले होते. विजयने असेही म्हटले होते की, जर कोणी त्याचे नाव, त्याचा फोटो किंवा फॅन क्लब वापरत असेल, तर तो त्यांच्यावर गुन्हा दाखल करेल.असाच प्रकार घडल्याने अभिनेत्याने त्याच्या पालकांसह ११ लोकांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

    अभिनेता थलापती विजय हा दक्षिण चित्रपटातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने आतापर्यंत साऊथ सिनेमात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याने ‘मास्टर’, ‘सरकार’, ‘थुपाक्की’, ‘जिल्हा’, ‘बीस्ट’ अशा अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला.