vivek

कोरोना वॅक्सिनचा(corona vaccine) पहिला डोस घेतल्यानंतर अभिनेता विवेक(south indian actor vivek passed away) यांचं निधन झालं आहे. यामुळे कोरोना वॅक्सिन आणि हार्ट अटॅकबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. विवेक यांच्या मृत्यूमुळे टॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

    चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता विवेक (Actor Vivek) यांचं चेन्नईमध्ये एका रुग्णालयात निधन झालं आहे. ते ५९ वर्षांचे होते. विवेक यांना १६ एप्रिलला त्यांना हार्ट अटॅक आला होता. कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर अभिनेता विवेक यांचं निधन झालं आहे. यामुळे कोरोना वॅक्सिन आणि हार्ट अटॅकबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. विवेक यांच्या मृत्यूमुळे टॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार १५ एप्रिलला विवेक यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन  कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर १६ एप्रिलला त्यांना हार्ट अटॅक आला. चेन्नईच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये विवेक यांना भरती करण्यात आलं. विवेक यांची तब्येत गंभीर होती. शेवटी आज पहाटे ४.४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    कोरोनावरची लस घेतल्यानंतर विवेक म्हणाले होते, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोविड लस घेणं एकदम सेफ आहे. ही लस घेतली तर आपण आजारी पडणार असं तुम्हाला वाटत असेल, पण तरीही लक्ष ठेवावंच लागेल. वॅक्सिनमुळे आपली रिस्क कमी होईल हे मात्र निश्चित.

    अभिनेता विवेक यांनी अनेक तामिळ सिनेमात काम केलं. ते कॉमेडी भूमिकाही छान करायचे.  सिनेमातल्या योगादानासाठी विवेक यांनी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.