samantha and naga chaitanya

आज अभिनेत्री समंथाने सोशल मीडियावर नवरा नागा चैतन्यपासून(Samantha Akkineni To Divorce Naga Chaitanya) वेगळं होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नाग चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाबाबत चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आज दोघांनीही घटस्फोट घेत असल्याचे सगळ्यांना सांगितलं आहे. दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni ) सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळेच तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. आज अभिनेत्री समंथाने सोशल मीडियावर नवरा नागा चैतन्यपासून वेगळं होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

    Samantha post

    ‘आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल. आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार’, अशी पोस्ट लिहित आज समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

    या घटस्फोटामागचे खरे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र समंथा आणि नागाच्या चाहत्यांसाठी ते घटस्फोट घेत आहेत, ही बातमी म्हणजे मोठा धक्का आहे.