मृत्यूपूर्वी श्रीदेवीने लेकीला दिलेला एक सल्ला, जान्हवी आजही त्याप्रमाणेच वागते, मुलाखतीत केला खुलासा!

अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा श्रीदेवीचे जुने फोटो शेअर करुन आपल्या आईच्या आठवणी शेअर करत असते. जान्हवीच्या पोस्ट्सवरून हे स्पष्ट दिसून येते की, ती अजूनही आपल्या आईला किती मिस करते.

  आपल्या बिनधास्त अभिनयाने ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवीने २०१८ मध्ये अचानक जगाचा निरोप घेतला. तिच्या अचानक एक्झिटने कुटुंबाबरोबरच चाहत्यांनाही धक्का बसला. तिची जागा कधीच कोणी भरून काढू शकत नाही. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी कपूर व खुशी कपूर बर्‍याचदा तिच्या आठवण शेअर करताना दिसतात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा श्रीदेवीचे जुने फोटो शेअर करुन आपल्या आईच्या आठवणी शेअर करत असते. जान्हवीच्या पोस्ट्सवरून हे स्पष्ट दिसून येते की, ती अजूनही आपल्या आईला किती मिस करते. एका मुलाखतीत जान्हवीने पुन्हा एकदा आपल्या आईची मनापासून आठवण काढत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सांगितलं की,  आई एक शक्तिशाली आणि हुशार महिला होती, आणि आजही ती आईने दिलेला एक सल्ला आठवतो, जान्हवी म्हणाली की, आलिया भट्ट, सारा अली खान किंवा कोणत्याही सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मिठी मारता येणे प्रेरणादायक आहे, मात्र कशासाठीही कोणावर अवलंबून राहू नये. पुढे बोलताना जान्हवी म्हणाली,  माझ्या आसपास अनेक शक्तीशाली स्त्रिया आहेत, माझ्या सहकारी ते आलिया, सारा यांच्यापासून बियॉन्से ते माझी बहीण खुशी या सर्वांना पाहून मला प्रेरणा मिळते, या स्त्रिया समाजात अतिशय मानाने वावरतात आणि कशासाठीही कोणावर अवलंबून राहत नाहीत.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  जान्हवी कपूर शेवट हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘रुही’मध्ये दिसली होती. त्यात अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांची देखील मुख्य भूमिका होती. आता ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर ‘दोस्ताना 2’ मध्येही दिसणार आहे.