अथर्व आणि अनन्या यांचा पहिला गुढीपाडवा, मालिकेच्या सेटवर साजरा करण्यात आला सण!

अथर्व आणि अनन्या मिळून गुढी उभारताहेत, हे दृष्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने सेटवर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

    अथर्व आणि अनन्या या जोडीनी थोड्याच काळात चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा पहिल्या भेटीपासून आत्तापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. श्रीमंताघरची मुलगी आणि मध्यम घरातला मुलगा यांची हळुवार फुलत जाणारी प्रेम कहाणी या मालिकेत पाहायला मिळते आहे.

    ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत प्रेक्षकांना गुढीपाडवा पाहायला मिळणार आहे. अथर्व आणि अनन्या यांच्या लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा असल्याने अरुणाची इच्छा आहे की त्यांनीच घरची गुढी उभारावी, पण अनन्याच्या वडिलांची, जगदीशची तब्येत खराब असल्यानं तिला माहेरी राहावं लागतं, पण गुढी उभारायच्या वेळी अनन्या घरी आल्याचं पाहून अरुणाला खूप आनंद होतो. अथर्व आणि अनन्या मिळून गुढी उभारताहेत, हे दृष्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने सेटवर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला.