त्या एका instagram पोस्टमुळे लपून बसलेला सिद्धार्थ पिठानी एनसीबीच्या जाळ्यात सापडला, वाचा नेमकं काय घडलं!

सिद्धार्थ हा सुशांतच्या अंतसंस्काराच्या वेळी हजर होता. एका सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्यामुळे सिद्धार्थ एनसीबीच्या रडारवर आला होता.

  सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. सीबीआय आणि एनसीबी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पण अद्याप म्हणावं तस काहीच हाती लागलेलं नाही. एनसीबीने सिद्धार्थ पिठानी याला हैदराबादमधून अटक करण्यात आली, त्यामुळे या प्रकरणाची तपासाची दिशा बदली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Siddharth pithani (@pithanisiddharth)

  सुशांत राजपूतने मागील वर्षी १४ जून २०२०ला मुंबईतील वांद्रे इथं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आधी मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास केला. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने मुंबईत येऊन नव्याने तपास सुरू केला. आता वर्षभरानंतर सुशांतचा रूममेट सिद्धार्थाला अटक केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Siddharth pithani (@pithanisiddharth)

   

  सिद्धार्थ हा सुशांतच्या अंतसंस्काराच्या वेळी हजर होता. एका सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्यामुळे सिद्धार्थ एनसीबीच्या रडारवर आला होता. सुशांतच्या निधनानंतर त्याने आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करून टाकले होते. आता अलीकडेच त्याने नवीन अकाऊंट सुरू केले आहे. ऑगस्ट महिन्यापासून सिद्धार्थ एनसीबीच्या ताब्यात सापडू नये म्हणून लपून राहत होता. नवीन अकाऊंटवर एप्रिल महिन्यात त्याने जिममधील काही फोटो शेअर केले होते. त्यासोबतच त्याने आपल्या साखरपुड्याचे फोटो सुद्धा पोस्ट केले होते.

  फोटो पोस्ट केल्यानंतर सिद्धार्थने आपल्या जिमला सुद्धा टॅग केले होते. त्यानंतर एनसीबीने जिमचा पत्ता शोधून काढला. सिद्धार्थला समन्स सुद्धा बजावण्यात आला होता, पण तो काही उत्तर द्यायला तयार नव्हता. अखेर त्याला अटक करण्यात आली.