दीपा कार्तिकचा होणार घटस्फोट? रंग माझा वेगळा मालिकेत येणार नवा ट्विस्ट!

या सगळ्यात सौंदर्याची प्रतिक्रिया काय असेल? कार्तिकला दीपाच्या खऱ्या प्रेमाची किंमत कळणार का? दीपा या प्रसंगाचा सामना कसा करणार?  हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.

  स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आई होण्याचं सुख दीपाच्या पदरी पडलं खरं, पण ते तिला उपभोगता येत नाही आहे. कारण खुद्द कार्तिकनेच दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत पितृत्व नाकारलं आहे. डीएनए टेस्ट कर अथवा घर सोडून जा, असे दोन पर्याय असताना स्वाभिमानी दीपाने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  मालिकेत सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे. दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं. स्वाभिमानी दीपाने इनामदारांचं घर सोडत एकटं रहाण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीसमोर हतबल न होता ती दररोज नवनवी आव्हानं स्वीकारते आहे. या कठीण काळात सौंदर्या मात्र तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. सासुबाईँच्या आशिर्वादानेच पुढचा प्रवास करण्याचं दीपाने ठरवलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  सासुबाईंची खंबीर साथ असली तरी कार्तिकचा गैरसमज इतक्या टोकाला गेला आहे की त्याने आता दीपाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दीपावर त्याने जीवापाड प्रेम केलं त्याच दीपापासून विभक्त होण्याचं त्याने ठरवलं आहे. श्वेताच्या षडयंत्राला बळी पडत दीपापासून दूर जाण्याची वेळ कार्तिकवर आली आहे. या सगळ्यात सौंदर्याची प्रतिक्रिया काय असेल? कार्तिकला दीपाच्या खऱ्या प्रेमाची किंमत कळणार का? दीपा या प्रसंगाचा सामना कसा करणार?  हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.