अंकिताच्या महानाट्याचा होणार पर्दाफाश,देशमुख कुटुंब काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला!

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिताच्या या नाट्याविषयी अनिरुद्धला कल्पना आहे. अनिरुद्धला सर्व माहित असूनही त्याने या सर्व गोष्टींवर मौन धरलं हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे.

  स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिषेकशी लग्न व्हावं म्हणून अंकिताने आत्महत्येचं खोटं नाटक रचलं. अंकिताच्या या वागण्याचा अभिषेकसोबतच संपूर्ण कुटुंबाला संशय होताच आता अखेरीस अंकिताचं पोलखोल करणार आहे. अंकिताने आत्महत्येचं हे खोटं नाट्य कसं रचलं? यात कोण कोण सामील होतं? हे सारं आता उघड होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिताच्या या नाट्याविषयी अनिरुद्धला कल्पना आहे. अनिरुद्धला सर्व माहित असूनही त्याने या सर्व गोष्टींवर मौन धरलं हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात पुन्हा एकदा उलथापालथ होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  अरुंधती आणि अनिरुद्धचं नातं अतिशय नाजूक वळणावर असताना अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती पुन्हा एकदा दुखावली गेली आहे. आतापर्यंत प्रत्येक संकटाचा देशमुख कुटुंबाने एकत्र येऊन धीराने सामना केला आहे. त्यामुळे अंकिताचं पितळ उघडं पडल्यावर देशमुख कुटुंब काय निर्णय घेणार याची उत्कंठा वाढली आहे. मालिकेतलं हे नवं वळण अनुभवण्यासाठी न चुकता पाहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.