झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका नेहमी टीआरपीमध्ये अव्वल स्थानी असायची. या मालिकेबरोबरच झी मराठीवरील अनेक मालिका टीआरपीमध्ये पहिल्या पाच मध्ये असायच्या. पण आता गेले काही आठवडे स्टार प्रवाहच्या मालिकांनी टीआरपीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. कारण या आठवड्याच्या टिआरपीनुसार पहिल्या पाचमध्ये सर्व मालिका या स्टारप्रवाह वरील आहेत.

View this post on Instagram
१. बार्कच्या रिपोर्टनुसार स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल ठरली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. जयदीप आमि गौरी ही दोन्ही पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
View this post on Instagram
२. दुसऱ्या क्रमांकावर मुलगी झाली हो ही मालिका आहे. मुलगी झाली हो या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत एका महिलेने सगळ्यांचा विरोद पत्करून मुलीला जन्म दिला. आणि एकटीनी तिची संपूर्ण जबाबदारी स्विकारली.
View this post on Instagram
३. तिसऱ्या क्रमांकावर फुलला सुगंध मातीचा ही मालिका आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांच वर्चस्व जरी असलं तरी लग्नानंतर तीने घरातच बसावं, धुणी भांडी करावी संसार करावा अशी अपेक्षा बऱ्याचदा सासरकडच्यांची असते. पण एकमेकांना साथ देत कसा संसार करावा हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे.
View this post on Instagram
४. तर चौथ्या क्रमांकावर रंग माझा वेगळा ही मालिका आहे. या मालिकेने सर्वांचच लक्ष वेधलं. रंगावरून अपमानाचे अनेक प्रसंग घडतात याच विषयावर ही मालिका आधारीत आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर, अभिज्ञा भावे मुख्य भुमिकेत आहेत.
५. पाचव्या क्रमांकावर सह कुटूंब सह परिवार ही मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांबरोबरच मालिकेची कथाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.