हटके नावाची हटके गोष्ट ‘स्टोरी ॲाफ लागिरं’, लवकरच येणार प्रेक्षकांसमोर!

या सिनेमात रोहितच्या प्रेयसीचा मृत्यू होतो त्यामुळे त्याची प्रेयसी लांब जाते आणि यात शुभांगी इनामदार हे पात्र त्याच्या  सोबती म्हणून राहतं. यानंतर ही मुलगी बिघडलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि त्याला एक चांगली व्यक्ती बनवते.

  सध्या संपूर्ण जग हे इंटरनेटमुळे एकत्र आल्या कारणाने या लॉकडाऊनमध्ये देखील सर्वाना घरबसल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत होती, आणि याच संधीचा फायदा घेत आगामी विविध मराठी सिनेमांच्या घोषणा होत गेल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी मराठी चित्रपट “स्टोरी ॲाफ लागिरं” चे टिझर मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नेटकऱ्यांच्या उदंड प्रतिसाद नंतर जी के फिल्मस क्रियशन निर्मिती त्यांचा “स्टोरी ॲाफ लागिरं” हा  मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात  जून २०२१ रोजी प्रदर्शित करणार असल्याची घोषणा सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वरून करण्यात आली आहे. मोठ्या पडद्यावर येण्याच्या दमदार तयारीत असलेला रोहित राव नरसिंगे दिग्दर्शित “स्टोरी ॲाफ लागिरं” सिनेमा प्रेमाची नवीन व्याख्या सांगणारा आहे.

  चित्रपटाचं नाव जितकं हटके आहे तितक्याच हटके त्याची कहाणी असेल यात काहीच शंका नाही. चित्रपटाचे निर्माता बंडू नामदेव मेश्राम आणि दिग्दर्शित रोहित राव नरसिंगे यांचा हा पहिला सिनेमा आहे. लॉकडाऊन नंतर सुरु होणाऱ्या प्रेक्षकांच्या बदललेल्या आयुष्यासाठी हा सिनेमा उत्तम पर्याय ठरणार आहे.

  ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतच संपले असून, या चित्रपटाचे दिग्दर्शिन रोहित राव नरसिंगे यांनी केले आहे तर जी के फिल्मस  क्रिएशन निर्मित संस्थेअंतर्गत बंडू नामदेव मेश्राम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात रोहित राव नरसिंगे सोबत चैताली चव्हाण आणि ऋतूजा आंद्रे,मोहन जाधव सोमनाथ येलनुरे आणि मराठी चित्रपट सृष्टीमधील चमकतां तारा संजय खापरे स्क्रिन शेअर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘स्टोरी ॲाफ लागिरं’ या चित्रपटाचा मोशन लोगो लूक प्रदर्शित करण्यात आला होता, या लोगो लूकमध्ये टीमसोबत कलाकारांची माहीती देण्यात आली होती. या लोगो लूकवरुन या चित्रपटात एक जबरदस्त लव्ह स्टोरी आणि कडक गाणे पहायला मिळेल असं वाटतं.

  या चित्रपटात रोहित राव नरसिंगे फक्त अ‍ॅक्शन सीन नाही तर तो ऋतूजा आद्रे सोबत रोमान्स देखील करताना दिसणार आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ऋतूजा आद्रे रोहितच्या मिठीत असल्याचे पाहायला मिळतय तर चैताली चव्हाण रोहितच्या एकतर्फी प्रेमात असल्यांच दिसतय.त्याचप्रमाणे संजय खापरे यांचा रोहित राव नरसिंगे वर असलेला राग दिसून येतोय. फोटो शेअर करत चाहता म्हणतेय ‘मी आज खूप उत्सुक आहे कारण रोहित राव नरसिंगे सोबत स्टोरी ॲाफ लागिरं या आगामी सिनेमाचं शूटिंग पुर्ण झालय. त्यासोबतच आमच्या टीमला तुम्ही भेटायला तयार आहात ना? अशा आशायाचं कॅप्शन चाहत्याने त्या फोटोला दिले आहे.

  या सिनेमात रोहितच्या प्रेयसीचा मृत्यू होतो त्यामुळे त्याची प्रेयसी लांब जाते आणि यात शुभांगी इनामदार हे पात्र त्याच्या  सोबती म्हणून राहतं. यानंतर ही मुलगी बिघडलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि त्याला एक चांगली व्यक्ती बनवते. अजून कोणत्या नव्या गोष्टी असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यातचं आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दलची  उत्सुकता अधिकचं राहील.

  रोहित राव नरसिंगे या सिनेमात रोहितची मूख्य भूमिका साकारणार आहे तर, ऋतूजा आंद्रे त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. चैताली चव्हाण अक्षयला सुधारणारी व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल.संजय खापरे हे या चित्रपटात एका पोलीस इन्सपेक्टर तर सोमनाथ येलनुरे व मोहन जाधव त्याच्या मित्राच्या भुमिकेत दिसणार आहेत.संजय खापरे,प्रेमा किरण,मिलिंद दास्ताने कास्ट असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.