सतीश-प्रशांत १४ वर्षांनी आले एकत्र, ‘स्ट्रीम्स ७’ डिजिटल चॅनेलची केली सुरूवात!

डिजिटल थिएटरच्या माध्यमातून सिनेमे प्रदर्शित करणाऱ्या या वाहिनीच्या सीओओ पदी सतीशनं प्रशांतला विराजमान केलं आहे. याबाबत सतीश म्हणाला की, 'स्ट्रीम्स ७'च्या निमित्तानं मी आाणि प्रशांत १४ वर्षांनी पुन्हा एकत्र आलो आहोत.

    आजवर बऱ्याच तंत्रज्ञांनी जोड्यांच्या रूपात रसिकांचं मनोरंजन केलं आहे. सतीश मोतलिंग आणि प्रशांत गिरकर या दोन दिग्दर्शकांनी १४ वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं. सतीश उत्तम कॅमेरामन आणि दिग्दर्शक आहे. प्रशांतनंही दिग्दर्शनाच्या माध्यमातून मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. आता हे दोघे एकाच मंचावर एकत्र आले आहेत. सतीशनं ‘स्ट्रीम्स ७’ हे स्वत:चं डिजिटल चॅनेल सुरू केलं आहे.

    डिजिटल थिएटरच्या माध्यमातून सिनेमे प्रदर्शित करणाऱ्या या वाहिनीच्या सीओओ पदी सतीशनं प्रशांतला विराजमान केलं आहे. याबाबत सतीश म्हणाला की, ‘स्ट्रीम्स ७’च्या निमित्तानं मी आाणि प्रशांत १४ वर्षांनी पुन्हा एकत्र आलो आहोत. व्ही. शांताराम यांच्या बॅनरखाली प्रशांतनं मला डीओपीच्या रूपात ब्रेक दिला होता. त्याच्यामुळेच मी दिग्दर्शकही बनलो. आज तो ‘स्ट्रीम्स ७’चा कंटेट हेड बनल्याचा आनंद असल्याची भावना सतीशनं व्यक्त केली आहे.

    गुरू पार्वती कुमार आणि रमेश पुरव यांच्याकडून शिक्षण घेतलेल्या प्रशांतनं सोळाव्या वर्षी डान्सर आणि कोरिओग्राफरच्या रूपात कारकीर्द सुरू केली. दामू केंकरे, विनय आपटे, मच्छिंद्र कांबळी, देबू देवधरांसारख्या दिग्गजांना असिस्ट करणाऱ्या प्रशांतनं छोट्या पडद्यावर खूप काम केलं आहे. त्याचा ‘इश्श’ हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता. ‘ये खुला आसमां’ या हिंदी चित्रपटानं इंटरनॅशनल लॅास अँजेलेस फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.