सुबोध भावेच्या लव्हस्टोरीची २० वर्षे, “तू तिथे मी” म्हणत शेअर केले खास फोटो!

सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते. मात्र दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला.

  अभिनेता सुबोध भावेच्या लग्नाचा आज २० वा वाढदिवस आहे. अभिनेता सुबोध भावेने बालमैत्रीण मंजिरी हिच्याशी लग्न केलं. २००१ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. “लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… खूप काही न लिहिता ‘तू तिथे मी’ इतकंच” असं कॅप्शन देत सुबोधने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

  सुबोधची लव्ह स्टोरी तितकीच खास आहे. सुबोध आणि मंजिरीने अनेक मुलाखतींमध्ये त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. अगदी कमी वयातच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.  सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते. मात्र दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

  १० वीला असतानाच सुबोधने मंजिरीला प्रपोज केलं. तर मंजिरीने देखील हटके अंदाजात सुबोधला उत्तर दिलं. एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी सुबोधला म्हणाले की बालगंधर्वच्या पुलावर ठराविक वेळेला आले तर हो समज.. त्यानंतर मी त्यावेळेला पुलावर गेले.. तेव्हापासून आमचं नातं सुरू झालं” सुबोध आणि मंजिरी ३० वर्षांपासून सोबत आहेत. या दोघांना मल्हार आणि कान्हा ही दोन मुलं आहेत. सुबोधवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)