सुशांतच्या आयुष्यावर आधारित बायोपिक ‘सुसाईड ऑर मर्डर?’ चे पोस्टर प्रदर्शित

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून या जगातून घेतलेली एक्झिट सगळ्यांचा मनाला चटका लावून गेली. त्याने आत्महत्या का केली हे अजून नेमके समजलेले नाही. त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून या जगातून घेतलेली एक्झिट सगळ्यांचा मनाला चटका लावून गेली. त्याने आत्महत्या का केली हे अजून नेमके समजलेले नाही. त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण सगळ्यात जास्त जबाबदार धरले जात आहे ते या इंडस्ट्रीमधील नेपोटीझमला. घराणेशाहीचा वाद तोही बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अशातच विजय शेखर गुप्ता यांनी सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट काढायचे ठरवले आहे. त्या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ‘सुसाईड ऑर मर्डर?’ असे या चित्रपटाचे नाव आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील एकाधिकारशाही संपावी हा या सिनेमा बनविण्यामागचा उद्देश असल्याचे विजय गुप्ता यांनी सांगितले आहे.

विजय सांगतात की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरून खुप मुले- मुली येतात. पण इथे तयार झालेल्या गँगमुळे त्यांना योग्य ती संधी मिळत नाही. या गँगला तोडण्याचा विचार आहे. सुशांतसोबत जे जे घडले ते ते आता उजेडात येईल. एका पाठोपाठ एक चित्रपट काढून घेऊन सुशांतला आत्महत्येसाठी भाग पाडले असल्याचे विजय म्हणाले. सुशांतसारख्या मानसिकतेतून गेलेल्या कलाकारांची कथा या चित्रपटात असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शमिक मलिक करणार आहेत.