‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शालिनी वहिनीची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री!

शालिनी उर्फ अभिनेत्री माधवी निमकरचा १७ मे १९८२ ला खोपोली, रायगड जिल्ह्यात जन्म झाला. माधवी अभिनय क्षेत्रात तिची मावस बहिण सोनाली खरेमुळे आली.

    स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने साकारली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे ही माधवी निमकरची मावस बहिण आहे हे फारच कमी लोकांना माहितेय.

    शालिनी उर्फ अभिनेत्री माधवी निमकरचा १७ मे १९८२ ला खोपोली, रायगड जिल्ह्यात जन्म झाला. माधवी अभिनय क्षेत्रात तिची मावस बहिण सोनाली खरेमुळे आली. कारण सोनालीच्या शूटिंगवेळी माधवीदेखील तिच्यासोबत शूटिंगला जायची. इथूनच तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली.

    २००९ साली ‘बायकोच्या नकळत’ या चित्रपटातून माधवीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर असा मी तसा मी या चित्रपटात ती झळकली. त्यानंतर नवरा माझा भवरा, सगळं करून भागलं, धावा धाव, संघर्ष अशा चित्रपटातून ती विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. सध्या तिने शालिनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.