सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये रंगणार मंगळागौर विशेष भाग!

आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतिकाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत.

     श्रावण महिना म्हंटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवारमहादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो, कारण मंगळागौर हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जाणार आहे. मंगळागौरीची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतिकाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. यात अपवाद म्हणजे कामिनी कारण तिला शिक्षा देण्यात आली आहेइतर महिलांसोबत लतिका देखील मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल. तेव्हा नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचा मंगळागौर विशेष भाग सोम ते रवि रात्री ९.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

    लतिकाची बँकेतील मैत्रीण रूपाली हिची ही मंगळागौर साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळेच मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात आली आहे. आणि सगळ्या बायका मिळून मोठया उत्साहात मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत. या पूजेसाठी रसिकाने धुमाळ आणि जहागीरदार कुटुंबाला आमंत्रण दिले आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार ? काय घडणार ? हे नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये