Video ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत नवी एन्ट्री, ‘ही’ अभिनेत्री दिसणार नंदिनीच्या भूमिकेत!

नंदिनीच्या येण्याने मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहचणार हे नक्की.

  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहचली आहे. एकामागून एक ट्विस्ट सतत या मालिकेत येत आहेत. मालिकेत अभ्या आणि लतिकाच्या मैत्रीलाही बापूंचा विरोध आहे. एकीककडे अभ्या लतिकाला मनवून घरी आणायच्या तयारीत आहे तर दुसरीकडे बापू मात्र या दोघांची मैत्री टिकू नये म्हणून पुरेपुर प्रयत्न करत आहेत. यातच आता मालिकेत आणखी नवीन एन्ट्री होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by NavaRashtra (@navarashtra)

  नंदीनी असं या नवीन कॅरेक्टरचं नाव आहे. नेमकी नंदनी कोण आहे? ती अभि- लतिकाच्या बाजूने उभी राहणार की दौलतच्या हे तुम्हाला मालिका बघितल्यावरच समजणार आहे. पण या नंदिनीच्या येण्याने मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहचणार हे नक्की.

  नंदिनी च्या भूमिकेत अभिनेत्री अदिती द्रविड दिसणार आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने आदितीला एक ओळख मिळवून दिली. आदिती उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे.‘या गोजिरवाण्यात घरात’ या नाटकात तिने प्रमुख भूमिका केली आहे. ‘या गोजिरवाण्यात घरात’ या नाटकातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे २०१७ साली संस्कृती कलादर्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

  त्याचबरोबर आदिती बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत तुळसाच्या भूमिकेतही दिसली होती. आता तिच्या या नवीन भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असणार हे नक्की.