अक्षयवर ५०० कोटी आज सगळेच लावतील, पण माझ्यावर…सुनील शेट्टीने वाचला त्याच्याच चुकांचा पाढा!

मी फार काही वेगळे करण्याचे धाडस केले नाही. जर तुम्ही रिस्क घेत नाही तर तुम्ही अभिनेता नाही. तुम्हाला स्वत:ची वेगळी स्टाइल बनवावी लागते.

    अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगणसारखे यश आणि ग्लॅमर  सुनील शेट्टीला मिळवता आलं नाही. खुद्द सुनील शेट्टीने एका मुलाखतीत याची कबुली दिली आहे.  करिअरमध्ये मीच अनेक चुका केल्यात आणि त्याच मला नडल्या, त्यामुळे मला आज चित्रपट मिळाले नाहीत असं सुनील शेट्टी म्हणाला.

    १९९२ साली ‘बलवान’ या सिनेमातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. सुनील शेट्टीने क्रोध, सपूत, हेराफेरी, हूतूतू, भाई, धडकन, दिलवाले असे अनेक सिनेमे केले. या सिनेमाने तो अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला.

    या मागचं कारण सुनील शेट्टीने सांगितलं आहे, तो म्हणाला, एक सुनील शेट्टी होतो, जो काही वर्षानंतर अपयशी ठरला. कारण त्याने नेहमी सब्जेक्टवर विश्वास ठेवला. मार्केटींग त्याला कधीच जमलं नाही. मी टाइपकास्ट अर्थात त्याच त्या भूमिका केल्यात, म्हणून अपयशी ठरलो असे नाही तर मी नेहमी सेफ राहण्याचा प्रयत्न केला. मी फार काही वेगळे करण्याचे धाडस केले नाही. जर तुम्ही रिस्क घेत नाही तर तुम्ही अभिनेता नाही. तुम्हाला स्वत:ची वेगळी स्टाइल बनवावी लागते.

    आज कोणताच निर्माता सुनील शेट्टीवर ५०  कोटी रुपये लावणार नाही पण अक्षय कुमारवर ५०० कोटीसुद्धा लावायला सगळे तयार आहेत. एक ना अनेक चुका करिअरमध्ये मला घातक ठरल्या. अर्थात आज पश्चाताप नाही. कारण या चुकांमधून मी खूप काही शिकलोय. कदाचित मी जे काही शिकलो ते माझ्या मुलाला त्याच्या करिअरमध्ये उपयोगी पडेल, असेही त्याने सांगितले.