sunil shetty

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. फक्त देशातील नाही तर जगातील काही लोकप्रिय नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचे नाव घेतले जाते. आज अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे पंतप्रधानांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेता सुनिल शेट्टी यानेदेखील मोदींना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सुनील शेट्टीने व्यायाम करतानाचा एक फोटो पोस्ट करुन मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, शिकण्याचं वय नसतं, तुमच्याकडून हे तत्वज्ञान शिकायला हवं. तंत्रज्ञान असो वा हेल्थ फिटनेस तुम्ही नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साही असता. नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला ७० सेकंदांची सलामी, असे ट्विट सुनील शेट्टीने केलेले आहे.