Sunny Leone

भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात प्रख्यात अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिका साकारणार आहे. 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केला.

भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात प्रख्यात अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

नृत्यांगनेच्या रूपात वावरणाऱ्या हेर म्हणजे गनिमाच्या भूमिकेत सनी लिओनी दिसणार आहे. 1795 ते 1818 या कालावधीत ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमाचे कथानक घडते. प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल महार योद्ध्याची भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते आणि गीतकार म्हणून रमेश थेटे जबाबदारी सांभाळत आहेत. सनीच्या व्यक्तिरेखेबद्दल थेटे यांनी गुप्तता पाळणे पसंत केले आहे. सनी या चित्रपटात एका नृत्यांगनेच्या भूमिकेत आहे, मात्र प्रत्यक्षात ती हेरगिरी करत असते, असे रमेश थेटे यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यामध्ये सनी अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने नऊवारी साडी नेसली असून केसात गजरा माळला आहे. हे गाणे जवळपास दिड लाख लोकांनी आतापर्यंत पाहिले आहे.

सनीने इन्स्टाग्रामवर चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ शेअर करत ‘हो आली रे आली.. मराठी मुलगी आली’ असे कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटातील सनीचे हे गाणे गायिका श्रेया घोशालने गायले आहे.