सनी लिओनीचं स्वप्न झालं पु्र्ण, मुंबईत खरेदी केलं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल!

सनीला तीन गाड्यांसाठी मेकॅनाईझ्ड कार पार्किंगही मिळणार आहे. या फ्लॅटचा संपूर्ण व्यवहार सनीने आपल्या करेनजीत कौर वोहरा या खऱ्या नावाने केला आहे.

    मुंबईत घर घेणं हे प्रत्येकाच स्वप्न असतं,. हे स्वप्न बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं पुर्ण झालं आहे. सनी लिओनी हिने नुकतंच मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. मुंबईतल्या अंधेरी भागात तिनं हे नवीन घर घेतलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

    सनी लिओनीने मुंबईतल्या अंधेरी भागात ४,३६५ चौरस फूटाचा फ्लॅट खरेदी केला आहे. याची किंमत १६ कोटी रुपये आहे. यासाठी तिने ४८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भराली आहे. हा व्यवहार २८ मार्चला करण्यात आला आहे. हा फ्लॅट बाराव्या मजल्यावर असणार आहे. रिऍल्टर क्रिस्टल प्राईड डेव्हलपर यांचा हा प्रकल्प आहे. सनीला तीन गाड्यांसाठी मेकॅनाईझ्ड कार पार्किंगही मिळणार आहे. या फ्लॅटचा संपूर्ण व्यवहार सनीने आपल्या करेनजीत कौर वोहरा या खऱ्या नावाने केला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

    सनी लिओनीने २०१२ सालच्या ‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’, ‘तेरा इंतजार’ असे हिंदी चित्रपट केले. तसंच ‘मधुरा राजा’ या मल्याळम चित्रपटातही तिने काम केलं आहे. ‘स्प्लिट्सव्हिला’ या कार्यक्रमाचं निवेदनही तिने केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sunny Leone (@sunnyleone)