deepika padukon

सिद्धार्थ चतुर्वेदीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यानंतर दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ चतुर्वेदी दोघेही ट्रेंडिगमध्ये आले.

सकाळपासूनच सोशल मीडियावर अभिनेत्री दीपिका पदुकोणचे फोटो व्हायरल होत आहेत. पण यावेळी नवरा रणवीर सिंग नाही तर गली बॉय फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदीबरोबर दीपिकाचे हे फोटो आहेत. सिद्धार्थ चतुर्वेदीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यानंतर दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ चतुर्वेदी दोघेही ट्रेंडिगमध्ये आले.

 

लवकरच हे दोघं शकुन बात्राच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाने नाव अद्याप निश्चित झालेले नाही. अनन्या पांडे सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. दीपिका मंगळवारी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अलिबागमध्ये आली होती. यावेळी अलिबागच्या प्रवासा दरम्यानचे हे फोटो आहेत. त्याचदिवशी मंगळवारी दिपिकाचा नवरा अभिनेता रणवीर सिंह तिला सोडण्यासाठी गेट वे ऑफ इंडियावर आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

सिद्धार्थ आणि दिपिका या फोटोमध्ये एकत्र शांतपणे समोर पाहताना दिसत आहेत. दोघांनी पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान केला होता. सिद्धार्थने दिपिकासोबतचे फोटो पोस्ट करुन त्याला ‘सनसेट लव्हर्स’ असे कॅप्शन दिले. तो फोटो पोस्ट केल्यानंतर सिद्धार्थचं कमेंट सेक्शन हार्टच्या इमोजीनी भरुन गेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटामध्ये दिपिका आणि सिद्धार्थ एकत्र काम करत आहेत. दिपिका याआधी ‘छपाक’ सिनेमामध्ये दिसली होती. झोया अख्तरच्या गली बॉय चित्रपटातील एमसी शेर या व्यक्तीरेखेने सिद्धार्थ चतुर्वेदीला ओळख मिळवून दिली. तर सध्या ड्रग्ज प्रकरणी देखील दीपिका चर्चेत होती. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी दीपिकाची चौकशीही केली.