४४ वर्षीय कोरिओग्राफर गीता माँ ने लॉकडाऊनमध्ये केलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो केला शेअर!

गीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गीताने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये गीता खूपच सुंदर दिसत आहे.

    प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर म्हणजेच सगळ्यांची लाडकी गीता माँ. गीता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गीता चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता एका नव्या पोस्टमुळे गीता मॉंची सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गीताची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Geetakapur (@geeta_kapurofficial)

    गीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गीताने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये गीता खूपच सुंदर दिसत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे गीताने लावलेल्या सिंदूरने वेधले आहे. गीता कपूरने लग्न केलं नाही हे सगळ्यांना माहित आहे. तर आता सगळ्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की गीता मॉं ने गपचूप लग्न केलं का?

    अनेकांनी कमेंट करतं गीताला तिच्या सिंदूर आणि लग्ना विषयी विचारलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “मॉं ने सिंदूर लावला… मॉं चे लग्न कधी झाले?” दुसरा नेटकरी म्हणाला, “मॉं ने कोणाच्या नावाचा सिंदूर लावला आहे?”  गीता मॉं ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ ची परिक्षक आहे. गीता आता पर्यंत अनेक डान्स रिअॅलिटी शोची परिक्षक होती.