सुपरस्टार नानीच्या ‘वी’ चित्रपटाचा अमेझॉन प्राईमवर वर्ल्ड प्रीमियर

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या आगामी तेलुगू अॅक्शन थ्रिलर ‘वी’च्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे. या चित्रपटात सुपरस्टार ’नानी’ मुख्य भूमिकेत असून सोबत अदिती राव हैदरी, सुधीर बाबू आणि निवेथा थॉमस महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. ज्याचे दिग्दर्शन आणि लेखन मोहन कृष्ण इंद्रगांती यांनी केले आहे. भारतासोबत २०० देश आणि प्रदेशात प्राइम सदस्य ५ सप्टेंबरपासून हा चित्रपट ‘वी’ अमेझॉन प्राईमवर स्ट्रीम करू शकतील.

याविषयी बोलताना सुपरस्टार नानी म्हणाला की, “मला स्वतःला अॅक्शन-थ्रिलर बघायला आवडतात आणि ‘वी’ एक असा चित्रपट आहे जो रोमांच, नाट्य आणि जबरदस्त अॅक्शनने भरपूर आहे. या प्रॉजेक्टमध्ये सुधीर बाबू आणि माझ्या व्यक्तिरेखेमधील उंदरा-मांजराच्या खेळाने मला सर्वात जास्त आकर्षित केले आहे. मी ‘वी’ च्या ग्लोबल प्रीमियरसाठी खूप उत्साहित आहे. हा माझा २५ वा चित्रपट आहे. या चित्रपटाला माझे चाहते प्राईम व्हिडीओवर २०० देश आणि प्रदेशात कुठेही, कधीही पाहू शकतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट ही की, या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर ५ सप्टेंबरला होतो आहे, याच दिवशी माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता.

‘वी’ एका पोलिसावरचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो एका क्राइम रायटरच्या प्रेमात पडतो. ज्यावेळी एक खूनी त्याला एक समस्या सोडवण्यासाठी आव्हान देतो तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. दिल राजू, शिरीष आणि हर्षित रेड्डीद्वारे निर्मित, ‘वी’चे दिग्दर्शन मोहना कृष्णा इंद्रगांती यांनी केले आहे आणि संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे.