rhea chakraborty

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी (SSR Death Case) संबंधित अंमली पदार्थ प्रकरणी (Drug case) रिया (riya chakraborty) आणि शौविक चक्रवर्ती (shawvik chakraborty) यांना अटक (arrested) करण्यात आली आहे. या दोघांनीही बुधवारी (९ सप्टेंबर) मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी (bail) अर्ज केला आहे. त्या जामीन अर्जावर आज सुनावणी (hearing) होणार आहे.

मंगळवारी न्यायालयाने जामीन देण्यास त्यांना नकार दिला होता. त्यानंतर या दोघांनी जामीन अर्जासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. ही याचिका त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दाखल केली असून यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. याचिकेत त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि त्यांची या प्रकरणी फसवणूक करण्यात आली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. एनसीबीने तीन दिवस चौकशी केल्यानंतर मंगळवारी रियाला अटक केली होती. अटक केल्यानंतर थोड्याच वोळात तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने तिला २२ सपटेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, त्याचा नोकर दीपेश सावंत, अंमली पदार्थांचा संशयित विक्रेता जैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांचाही या प्रकरणात समावेश आहे. यांच्याही जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.