सुशांतने २००६ मध्ये एका कॉमनवेल्थ खेळामध्ये सहभाग घेऊन डान्स केला होता. त्यानंतर ५१ व्या फिल्मफेअर अवार्डमध्ये त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून कामं केली होती.
सुशांतने २००६ मध्ये एका कॉमनवेल्थ खेळामध्ये सहभाग घेऊन डान्स केला होता. त्यानंतर ५१ व्या फिल्मफेअर अवार्डमध्ये त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून कामं केली होती.

सुशांतच्या आत्महत्येचं नेमक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आज सुशांतच्या निधनाला एक वर्ष पुर्ण झालं तरी अद्याप निकाल लागलेला नाही.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं १४ जून २०२० मध्ये आत्महत्या केली होती. या घटनेला आता एक वर्ष पुर्ण झालं आहे. सुशांतच्या मृत्यूमुळं अनेकांना जबरदस्त धक्का बसला. तो आत्महत्या करुच शकत नाही, असं अनेक नामांकित कलाकारांनी, चाहत्यांनी म्हटलं होतं. नोंदवलं होतं.

    त्यामुळं चाहत्यांच्या आग्रहाखातर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली. सुरुवातीला मुंबई पोलिसांद्वारे या प्रकरणी तपास सुरु होता. त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंड, सीबीआय आणि आता एनसीबीद्वारे प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येचं नेमक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आज सुशांतच्या निधनाला एक वर्ष पुर्ण झालं तरी अद्याप निकाल लागलेला नाही.

    सुशांत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती संशयीत आरोपी आहे. तिनं अंमली पदार्थांचं व्यसन लावून त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप तिच्यावर केला जात आहे. या प्रकरणी NCB नं तिला व तुचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना अटकही केली होती. या अटकेनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं. आणि आणखी काही नव्या अभिनेत्रींची नावं समोर आली.

    सुशांत मृत्यू प्रकरण सध्या अंमली पदार्थांभोवती फिरत आहे. NCB द्वारे त्याची जोरदार चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येमागे कोणाचा मेंदू होता का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.