Sushant Singh Rajput Death Case: रियाने केले सुशांतच्या बहिणीवर धक्कादायक आरोप, म्हणाली…

रियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की सुशांत आपली बहीण प्रियंका आणि मेहुणा सिद्धार्थ सोबत गांजा घेत असे आणि ते त्यांच्यासाठी गांजा देखील आणत असत.

    बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स एंगलमध्ये  रिया चक्रवर्तीच्या विधानास नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने समाविष्ट केलय. रियाने सुशांतच्या कुटूंबावर गंभीर आरोप केले आहेत. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांत तिला भेटण्यापूर्वीच मादक पदार्थांच्या आहारी गेला होता. रियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की सुशांत आपली बहीण प्रियंका आणि मेहुणा सिद्धार्थ सोबत गांजा घेत असे आणि ते त्यांच्यासाठी गांजा देखील आणत असत. रियाच्या कबुलीजबाबानुसार सुशांतच्या कुटुंबीयांना चांगल्या प्रकारे माहित होते की तो ड्रग्सच्या आहारी होता.

    रियाने एनसीबीला असेही सांगितले की, जेव्हा सुशांतची प्रकृती बिघडू लागली तेव्हा त्याचा भाऊ शौविक त्याला रुग्णालयात दाखल करण्यास तयार होता, पण त्याला ते पटले नाही. रियाने आपल्या निवेदनात सुशांतची बहीण प्रियंका यांनी तिला ८ जून २०२० ला व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनचा संदर्भही दिला होता. त्यामध्ये लिब्रियम १० मिग्रॅ, नेक्सिटो सारख्या औषधांचा उल्लेख होता जे एनडीपीएस अंतर्गत औषधे होती. प्रिस्क्रिप्शनमध्ये सुशांतला ही औषधे घ्यायला सांगितले होते. औषधांचे हे प्रिस्क्रिप्शन सुशांतला न भेटता दिल्ली येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ तरुण यांनी तयार केले होते. सल्लामसलत केल्याशिवाय ही औषधे दिली जाऊ शकत नाहीत.

    एनसीबीला दिलेल्या निवेदनात रियाने खास नमूद केले की प्रियंकाने पाठवलेल्या औषधांच्या सुशांतला ठार मारता आले असते. ८-१२ जूनच्या दरम्यान त्याची बहीण मितू त्याच्याकडे राहत होती. त्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.