अंकिता लोखंडे रमली सुशांतच्या आठवणीत, १ नाही तर तब्बल ३ VIDEO केले शेअर, व्हिडिओ बघून चाहते मात्र हळहळले!

अंकिताने सुशांतच्या खूप खास आठवणी आपल्या व्हिडीओमध्ये शेअर केल्या आहेत, हे पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत. अंकिताने सामायिक केलेल्या व्हिडीओमध्ये ती सुशांतसोबत दिसली आहे.

  अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं १४ जून २०२० मध्ये आत्महत्या केली होती. या घटनेला आता एक वर्ष पुर्ण झालं आहे. सुशांतच्या मृत्यूमुळं अनेकांना जबरदस्त धक्का बसला. तो आत्महत्या करुच शकत नाही, असं अनेक नामांकित कलाकारांनी, चाहत्यांनी म्हटलं होतं. नोंदवलं होतं. अशा परिस्थितीत आज सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्ताने सर्वजण त्याचे स्मरण करत आहेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेही  सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

  अंकिताने सुशांतच्या खूप खास आठवणी आपल्या व्हिडीओमध्ये शेअर केल्या आहेत, हे पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत. अंकिताने सामायिक केलेल्या व्हिडीओमध्ये ती सुशांतसोबत दिसली आहे. व्हिडीओमध्ये अंकिता आणि सुशांतचे अनेक फोटो कोलाज केले आहेत. या फोटोंमध्ये कधीकधी दोघांचीही लव्हस्टोरी बघायला मिळत आहे. हा व्हिडिओपाहून चाहत्यांना मात्र आश्रू अनावर झाले .

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)