sushant singh rajput

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडिल के.के. सिंह यांना रूग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रूग्णालयातील बेडवर के.के.सिंह आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या दोन्ही मुली या फोटोत पहायला मिळत आहेत. हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांना हरयाणामधील फरिदाबाद इथल्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुशांतच्या अनेक फॅनपेजेसवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा ताण त्यांना आणखी सहन होणार नाही, असं संबंधित व्यक्तीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. दुसरीकडे ईडी आणि एनसीबी या दोन्ही यंत्रणासुद्धा सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील आर्थिक आणि ड्रग्जच्या अँगलच्या तपास करत आहेत. सुशांतचे वडील लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. तर अनेकांनी सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.