
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर बसलेल्या धक्क्यातून त्याचे कुटुंब अजूनही सावरलेले नाही. अशातच सुशांतचे वडिल पहिल्यांदा माध्यमांसमोर बोलले आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर बसलेल्या धक्क्यातून त्याचे कुटुंब अजूनही सावरलेले नाही. अशातच सुशांतचे वडिल पहिल्यांदा माध्यमांसमोर बोलले आहेत. यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर ११ दिवसांनी त्यांनी आपले मन थोडे मोकळे करण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांंतचेे वडिल के. के. सिंह यांना सुशांतच्या कामाबद्दल खूप अभिमान होता. पण तो शवटच्या काही दिवसांमध्ये कशामुळे दु:खी होता ते कळू न शकल्याचे त्यांना वाईट वाटत आहे.
सुशांतच्या वडिलांनी माध्यमांना असे सांगितले की, सुशांतच्या जन्मासाठी आम्ही ३ वर्षे व्रत करत होतो. त्यानंतर त्याचा जन्म झाला. चार मुलींनंतर तो एकटा मुलगा होता. ज्याच्यासाठी व्रत केले जाते त्याच्यासोबत असेच काहीतरी होत असते.तो आम्हाला सोडून निघून गेला.
सुशांतचे वडिल पुढे म्हणाले की, जे होणार असतं ते आपण कधीच टाळू शकत नाही. त्याने कमी काळात खूपकाही केले होते.मात्र शेवटच्या दिवसात काय झाले तेे समजले नाही. तो त्याबद्दल काही बोलला नाही. सुशांतला बिहारसाठी, बिहारच्या लोकांसाठी काहीतरी करायचे होते. ते राहून गेले. त्याने चंद्रावरदेखील जमीन खरेदी केली होती. ती पाहण्यासाठी त्याने ५५ लाखांचा टेलिस्कोप खरेदी केला होता.