सुशांत सिंग राजपूत रहात होता त्या फ्लॅटमध्ये रहायचं आहे? एवढं भाडं भरा आणि तुम्हीही सीव्ह्यू घराचा आनंद घ्या!

सुशांतसिंग राजपूत १४ जून २०२० सुशांतच्या मृत्यूनंतर ६ महिन्यांपर्यंत हा फ्लॅट तपास यंत्रणेच्या ताब्यात होता.

    अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. बांद्र्यातील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला. मात्र सुशांत रहात असलेला फ्लॅट अद्याप रिकामाच आहे. सुशांतच्या गरमालकाला अजूनही नवा भाडेकरू मिळालेला नाही. पण अस समजतय या घरात राहण्यासही कुणी तयार नाहीये.

    सुशांतसिंग राजपूत १४ जून २०२० सुशांतच्या मृत्यूनंतर ६ महिन्यांपर्यंत हा फ्लॅट तपास यंत्रणेच्या ताब्यात होता.

    एवढं भाडं भरावं लागणार

    रिअ‍ॅलिटी फर्मच्या अहवालानुसार, खरं तर या फ्लॅटचं लोकेशन एकदम प्राइम आहे. एकदम प्रशस्त, सीव्ह्यू असलेला फ्लॅट आहे. सुशांत या घरासाठी पहिल्या वर्षी दरमहा ४ लाख ३० हजार, दुसऱ्या वर्षी ४ लाख ५१ हजार, तिसऱ्या वर्षी ४ लाख ७४ हजार रुपये घरभाडं देत होता. घरमालक आता ४ लाखा दराने भाडं घेऊन फ्लॅट देण्यास तयार आहे.