‘पवित्र रिश्ता २’ मुळे सुशांतची बहिण झाली भावूक, दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

“ही मालिका पुन्हा सुरू होतेय, याचा मला खूप आनंद होतोय. पवित्र रिश्ता २ मालिकेच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..”.

    गेल्या काही दिवसांपासून ‘पवित्र रिश्ता २’ ही मालिका बरीच चर्चेत आलीय. या मालिकेच्या पहिल्या सीजनमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण मालिकेचा दुसरा सीजन ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत सुशांत सिंह राजपूतच्या ऐवजी अभिनेता शाहिर शेख दिसणार आहे. ‘पवित्र रिश्ता २’ वर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने आपली प्रतिक्रिया दिलीय.

    सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केलीय. या स्टोरीमधून तिने ‘पवित्र रिश्ता २’ मधील स्टारकास्टसाठी एक इमोशनल मेसेज लिहिलाय. श्वेताने अभिनेता शाहिर शेख आणि अंकिता लोखंडे या दोघांचा एक फोटो सुद्धा शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना श्वेताने लिहिलं, “ही मालिका पुन्हा सुरू होतेय, याचा मला खूप आनंद होतोय. पवित्र रिश्ता २ मालिकेच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..”.

    श्वेताने शेअर केलेल्या या स्टोरीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सुशांतचे फॅन्स तसंच सोशल मीडियावर सर्व युजर्स श्वेताच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात. टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी ठरलेली ‘पवित्र रिश्ता २’ ही मालिका ११ वर्षापूर्वी प्रसारित झाली होती.